Sunday, June 22, 2025

Save4

भारतीय व्यवस्था: एक विश्लेषण

भारतीय व्यवस्था: एक विश्लेषण

"भारत एक व्यक्ति-पूजक देश आहे..."

भारत एक व्यक्ति-पूजक देश आहे हे व्यवस्थेचे मूळ आहे आणि जे कोणी व्यवस्थेला आव्हान देईल, जनता अशी आहे की त्याला समकालीन लोक कधीही मान्यता देताना दिसत नाहीत. हे वाक्य वादग्रस्त असू शकते, पण कोणताही उपदेश जगात प्रथम लिखित स्वरूपात आलेला नाही. वेद, त्रिपिटक, गीता, कुराण, गुरु ग्रंथ साहेब, बायबल, आणि अनेक पंथ, संप्रदाय यांचे प्रथम गुरु संदेश हे संवादातूनच आले आहेत.

व्यवस्थेचे स्वरूप: एक त्रिशूळ

वरील त्रिशूल असलेल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे, काही व्यवस्था दंड विधान ठरवणाऱ्या आहेत, तर काही त्या लोकांमध्ये रुजवणाऱ्या लोककौशल्य असलेल्या व्यवस्था आहेत.

दंड विधान ठरवणाऱ्या व्यवस्था

धर्म व्यवस्था

गुरु-शिष्य संवादातून आलेले संदेश, भविष्यकाळात चमत्कार आणि देवत्व सिद्ध करताना अनुयायांकडून गुणगान गायले गेले आणि धर्म शेवटी पुराण परंपरेला चिटकला. आज आपण ते फारसे मनावर घेत नाही किंवा आचरणात आणत नाही.

अर्थ व्यवस्था

ही काही मोजक्या लोकांची मक्तेदारी होती, आहे आणि राहील. पैसा मानवी जीवनातील प्रत्येक गोष्ट ठरवतो आणि कंपनी सरकार नंतर त्याचे महत्त्व जगाने ओळखले आहे. तो सर्वांना सारखी वागणूक देण्याचा प्रयत्न करतो.

न्याय व्यवस्था

ही सध्या फक्त स्वतःची जाणीव मोठ्या मोठ्या विधेयकांना अडचणीत आणून करून देते आहे. ती सध्या बहुतेक जणांना न्याय देताना दिसत नाही. तिच्या दृष्टीने फक्त राज्य आणि अर्थव्यवस्थेतील लोकच पात्र आहेत.

लोक कौशल्य असलेल्या व्यवस्था

शिक्षण व्यवस्था

बाजार झालेली ही व्यवस्था गुरुकुल परंपरेसारखी भासते. CAP, CAT, IIT, NEET सारख्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना घर सोडावे लागते. पारंपरिक व्यवसाय सोडून नवीन कौशल्ये शिकताना कुटुंबापासून जन्मभराची ताटातूट होते.

प्रचार-प्रसार व्यवस्था

सर्वात जास्त उत्क्रांत झालेली व्यवस्था. यात दोन गट आहेत: एक म्हणजे वाघ्या-मुरळी, तमाशा यातील लोककलाकार (आजचे नट-नटी) आणि दुसरा म्हणजे दवंडी पिटणारे (आजचे पत्रकार आणि संपादक).

शासन (राज्य) व्यवस्था

ही व्यवस्था घराणेशाहीला लागली आहे, याचा अर्थ व्यवस्थेची संक्रमण शक्ती क्षीण होत चालली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली तरतूद, की 'राजाचा वंश राजवंश म्हणून ओळखला जाणार नाही', ती आता संपवण्याचे काम सर्वप्रकारे होत आहे आणि यात एकूणच सर्व जनता आणि राजे सहभागी आहेत असेच म्हणावे लागेल.

© २०२४ - एक वैचारिक विश्लेषण.

No comments:

Post a Comment