देवधर्म पाळणे मग ते कोणत्याही मार्गाने का असेना हे संसारात राहणाऱ्या डोळस श्रद्धाळू माणसाचे कर्तव्य असते .
तसेच जेव्हा आपण ऊर्जा या गोष्टीवर विश्वास ठेवतो तेव्हा जवळपास सगळ्याच गोष्टी खऱ्या वाटतात ज्या आपण कल्पना करतो .
उदा. शिवाजीमहाराजांनी तलवार भवानी मातेकडून मिळवली . आता तलवारीचे तर माहीत नाही पण ती तलवार त्यांनी कशी का घेईना पण ती कोणावर , केव्हा आणि कशासाठी चालवावी ही ऊर्जा त्यांनी मिळवली असावी हे मात्र खरे ..
तसेच अल्लाह माननाऱ्या टीपुची पण एक तलवार आहे जिच्यावर उर्दूमध्ये त्याने केलेले पराक्रम नमूद आहे .
आणि
काही परोक्ष माहिती नुसार जेव्हा ब्रिटन राज्य एखादी लढाई जिंकायच तेव्हा ते तेथील एक माणूस मुर्दा घेऊन त्याला मेनात आणि paint सजवून संग्रहालयात ठेवत ( त्यांनी अशीही मागणी केली होती की सुभाषचंद्र बोस यांना पण भारत सरकारने सुपूर्द करावे जर भेटले तर).
म्हणजे या दोन्ही गोष्टी ऊर्जा आणि मान्यता जवळपास पूरक आहेत .
कारण जगातील कोणताही धर्मग्रंथ जो धर्म चालवला तो यांनी असे जेव्हा नमूद करतो . तर प्रथम पुरुषाने तो सांगितलं आहे (तोंडी) नंतर तो जेव्हा कधी मर्यादेबाहेर वाढला तेव्हा अनेक लोकांचे अनेक प्रश्न त्याला सोडवावे लागतात आणि एकच धर्म पण वेगवेगळ्या पंथाने लोक जाऊ लागली तेव्हा ते प्रमाण राहावे म्हणून त्यांनी ग्रन्थ बनवले आणि ते जवळपास पुजाऱ्यांना पुरेल असेच बनवले .
पुढे "जिंकेल त्याचा इतिहास" हे तर आपल्याला माहीतच आहे .
अशी असंख्य उदाहरणे आहेत जिथे ऊर्जा आणि तिचा वापर कसा होतो केला जातो (राजकारण, समाजकारण, भूगोल आणि व्यापार ).
तर मूळ मुद्दा असा की अशीच अवस्था आहे ती आम्हा लेखकांना प्रोत्साहन मिळणारी ऊर्जा .
माझ्या अगोदर जर बोललं तर सर्व संत परंपरा हे भारतीय संस्कृतीचे आद्य लेखक , त्यांनी प्रथम पूर्ण जीवनही स्वतःची गाथा लिहिली आणि अनुभवलेल्या सर्व गोष्टी मांडून ठेवल्या , लोकांनी त्यांच्या जिवंतपणी कधी त्यांना मान दिला न दिला तो गोष्ट वेगळी . पण त्यांनीच लिहिलेल्या मोजक्या गोष्टी आज सर्व लोक नाम संकीर्तन म्हणून वापरतात.
( अगोदर नमूद केल्या प्रमाणे नामदेव गाथा , ज्ञानेश्वरी , तुकाराम गाथा याचे सार हरिपाठ आणि रामदास दासबोध - मनाचे श्लोक, श्रीमद भागवत - एकनाथी भागवत ).
पुढ ती नौका कुसुमाग्रज, केशवसुत, अत्रे, भाई पू.ल. देशपांडे आणि ना. धो. महानोर अशा अनेक लोकानी लोटली .
चित्रगुप्त महाराज यांच्या बद्दल लिहिणे आवश्यक असण्याचे कारण उद्या कार्तिक शुक्ल द्वितीया आहे.
आणि जे चित्रगुप्त सर्व जगाचा लेखाजोखा ठेवतात, कर्मप्रधान व्यवस्थेच ते नियोजन करतात , भाऊबीज, यम द्वितीया सोबतच उद्या चित्रगुप्त पूजा ही आहे .
त्याच्या पूर्वसंध्येला हे लिहितो कारण उद्या लेखणी पूजा करतात .
अशीच ऊर्जा कायम सोबत राहू दे अशी जायकाई चरणी प्रार्थना.
No comments:
Post a Comment